‘वैकुंठ’ – शतशब्दकथा

‘वैकुंठ’-परिसर मला आवडतो. मी तिकडे नेहेमी जातो.

‘निवारा’मध्ये व्यायामशाळा आहे.

कोपऱ्यावरच अनेकविध चांगले कार्यक्रम होत असतात.

वैकुंठात असलेली झाडे, अनेकविध पक्ष्यांचे रात्रीचे वसतीस्थान असल्याकारणाने पक्षी-मोजणीसाठी म्हणूनही तिकडे जाणे होतेच.

एका भित्र्या मैत्रिणीच्या मागे लागलेल्या माणसाला हुकवताना ती इकडे शिरली होती आणि तिचा पाठलाग करणारा माणूस लक्षात आल्यावर घाबरून उलटा पळून गेलेला त्याची आठवण हसूच आणते.

पोचवायला येणाऱ्या माणसांचे आक्रोश मी ऐकलेत; मूठभर खरेखुरे दु:खी सोडता उरलेल्यांचे रडणेच काय आपापसातले संभाषणदेखील मोठेच मनोरंजक असते.

पण हल्लीच दिसले, ठोसरपागेतून रिकाम्या हाती भकास नजरेने परत येणारे जोडपे…

दोघेच दोघे होते

आणि एकदम गप्पही

‘वैकुंठ’-परिसर आता मला आवडत नाही.

आताशा मी तिकडे फिरकतही नाही.

One thought on “‘वैकुंठ’ – शतशब्दकथा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s